कराचीत जन्मलो तरी संघामुळे देशाशी एकनिष्ठ- अडवानी

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

आरएसएसकडून मी खूप काही शिकलो आहे. संघाने कधीच चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले नाही. देशासाठी एकनिष्ठता आम्ही संघाकडून शिकली आहे.

नवी दिल्ली - लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) काम करत आलो आहे. संघाचा मला अभिमान असून, प्रचंड आदर असल्याचे, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी सांगितले.

ब्रह्माकुमारीजच्या 80 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अडवानी यांनी संघाचे कौतुक केले. अडवानी सुरवातीपासूनच संघाशी जोडले गेलेले आहेत. या कार्यक्रमातही त्यांनी संघाबद्दल गौरवोद्गार काढले.

अडवानी म्हणाले, की माझी जन्म कराचीत झाला आहे. तरीही मी शिस्त आणि शिक्षणाचे धडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेऊ शकलो. आरएसएसकडून मी खूप काही शिकलो आहे. संघाने कधीच चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले नाही. देशासाठी एकनिष्ठता आम्ही संघाकडून शिकली आहे. लहानपणापासून ज्या संस्थेचे मी काम केले आहे, त्याबद्दल मला अभिमान आहे.