लेहमध्ये पारा उणे 11.9 अंशावर

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

पंजाब, हरियानातही तापमानात घट
श्रीनग-
जम्मू-काश्‍मीरमधील लेह हे सर्वाधिक थंड शहर ठरले. येथे आज पारा उणे 11.9 अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता.

पंजाब, हरियानातही तापमानात घट
श्रीनग-
जम्मू-काश्‍मीरमधील लेह हे सर्वाधिक थंड शहर ठरले. येथे आज पारा उणे 11.9 अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता.

काश्‍मीरमधील खोऱ्यातील तापमानात मोठी घट झाली असून, श्रीनगरमध्ये शुक्रवारी (ता. 9) रात्री यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी म्हणजे उणे 4.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले, असे हवामान विभागाने सांगितले. धुक्‍यामुळे शनिवारी तिसऱ्या दिवशीही हवाई वाहतूक विस्कळित झाली होती. पहलगाममध्ये किमान तापमान उणे 3 तर गुलमर्ग येथे उणे 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जम्मू-काश्‍मीरमधील लेह हे सर्वाधिक थंड शहर ठरले. येथे आज पारा उणे 11.9 अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता. कारगिलमध्ये उणे 8.2 अंश तापमान होते. येत्या 24 तासांत उंचावरील भागात हिमवर्षाव तर पठारी भागात पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. श्रीनगरमध्ये नळांतील पाणीही गोठले आहे. ते वितळविण्यासाठी नागरिक नळाभोवती शेकोटी पेटवित आहेत. जम्मूमध्ये आज किमान तापमान 11.6, कटरा येथे 10.7, जम्मूतील बाटोट गावात 6.5, बनिहालमध्ये 1.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले आहे.

पंजाबही, हरियानातही कडाका
जम्मू-काश्‍मीरप्रमाणेच पंजाब व हरियानातही तापमानात घट झाली आहे. दाट धुक्‍यामुळे दोही राज्यांतील रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अमृतसर, लुधियाना, पतियाळा, जालंधर, अंबाला, कुरुक्षेत्र, कनराल, पानीपत, गुरुग्राम आदी शहरांत धुक्‍यामुळे दृश्‍यमानता कमी झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. यामुळे वाहतूक विस्कळित झाली असून अनेक रेल्वेगाड्यांना विलंब लागत आहे. चंडीगडमध्ये 11.2 अंश सेल्सिअस, अंबालात 10.4, करनालमध्ये 10.2, अमृतसरमध्ये 8.8, लुधियानात 8.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले.