अभिनेता अक्षय कुमार 'यूपी'चा स्वच्छतादूत

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

लखनौ: अभिनेता अक्षय कुमारची "टॉयलेट एक प्रेम कहाणी' या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनापूर्वीच सुरू झाली आहे. हा चित्रपटाची कथा स्वच्छतेवर विशेषतः घरात शौचालय असण्यावर आधारित आहे. याची दखल घेत अक्षय कुमारला उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी जाहीर केले.

उघड्यावर शौचाला जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. यासाठी त्यांनी अक्षय कुमारची "ब्रॅंड ऍबेसिडर' म्हणून नियुक्ती केली आहे. लखनौ येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीच याबाबत घोषणा केली. "टॉयलेट'ची नायिका भूमी पेडणेकरही त्यांच्यासोबत होती. या वेळी अक्षय कुमारने आदित्यनाथ यांच्यासमोर "टॉयलेट'मधील गाणेही गायले.

लखनौमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यासह योगी आदित्यनाथ तो पाहणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची घोषणाही करण्यात आली. कार्यक्रमात अक्षय व भूमीने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह रस्त्याची झाडलोट केली. अक्षय कुमारने शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता राखण्याची शपथ दिली. लखनौमधील कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती अक्षयने ट्‌विटरवर दिली आहे. त्यानंतर काही वेळातच त्याने "टॉयलेट'मधील नव्या गाण्याविषयीही ट्विट केले.