लखनौ: पोलिसांबरोबरील चकमकीत गुन्हेगार ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

लखनौ: तुरुंगातून पळून गेलेल्या एक गुन्हेगार पोलिसांबरोबरील चकमकीत ठार झाला. गोमतीनगर भागात ही घटना घडली, असे पोलिसांनी आज सांगितले.

सुनील शर्मा असे पोलिस चकमकीत मरण पावलेल्या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यावर 15 हजार रुपयांचे बक्षीस होते. गोमतीनगर येथे पोलिसांबरोबरील चकमकीत सुनील शर्मा जखमी झाला होता. त्यानंतर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना तो मरण पावला, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले. सरोजिनीनगर परिसरातील एका व्यावसायिकाला गेल्या महिन्यात त्याने धमकी देऊन पैसे मागितले होते.