वराच्या 'नागीण' नृत्यामुळे वधूने मोडले लग्न

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

लखनौ: भारतीय विवाहात वराची मिरवणूक काढली जाते. त्या वेळी त्याची मित्रमंडळी, कुटुंबीय नृत्याची हौस भागवून घेतात. अशा प्रसंगी "नागीण नृत्य' आवर्जून केले जाते. हा अशा समारंभात "नागीण नृत्य' अतिशय लोकप्रिय आहे. मात्र, याच नृत्यामुळे वधूने विवाह मोडल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये नुकतीच घडली.

शाहजहानपूरमधील अनुभव मिश्रा आणि प्रियांका त्रिपाठी यांचा विवाह मंगळवारी (ता.27) होता. वधू-वरांकडील मंडळींचा भेटीगाठींचा कार्यक्रम झाल्यानंतर विवाहपूर्व विधी सुरू झाले होते. त्या वेळी वाजतगाजत येणाऱ्या वरातीत मद्य प्राशन केलेल्या वराने "नागीण नृत्य' करण्यास सुरवात केली. मद्याच्या नशेत अनुभव नृत्यात रंगला होता. त्याचे मित्रही त्याच्यावर पैसे ओवाळून त्याला प्रोत्साहन देत होते. हा हिडीस प्रकार पाहून वधू व तिचे कुटुंब हबकून केले. आपल्या भावी पतीला अशा अवस्थेत पाहून संतप्त झालेल्या प्रियांकाने अनुभवशी विवाह मोडण्याचा निर्णय जाहीर केला. ते ऐकून मिश्रा कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी वधूचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

हे प्रकरण एवढे तापले की अखेर पोलिसांना घटनास्थळी बोलविण्यात आले. पण याचा काहीही उपयोग झाला नाही. प्रियांका आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर मिश्रा परिवारातील वऱ्हाडी मंडळी वधूला न घेताच परतली. बुधवारी (ता.28) या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू कोतवाली पोलिसांच्या उपस्थितीत परत केल्या. विशेष म्हणजे या घटनेनंतर प्रियांकाने अन्य मुलाशी विवाह करून सुखी संसारास आनंदाने सुरवात केली.