राजस्थानमध्ये आठ रुपयांत मिळणार जेवण!

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

जयपूर (राजस्थान) - तमिळनाडूच्या धर्तीवर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 'अन्नपूर्णा रसोई' योजना आणली आहे. या योजने अंतर्गत आठ रुपयांमध्ये जेवण आणि पाच रुपयांमध्ये नाश्‍ता देण्यात येणार आहे. फिरत्या वाहनातून या सुविधेचा लाभ नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. वसुंधरा राजे यांनी पाच फिरत्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवत या योजनेचे उद्‌घाटन केले.,

राजस्थानमधील 12 जिल्ह्यात 80 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी वसुंधरा राजे यांनी दिली. लवकरच राजस्थानमधील सर्व 33 जिल्ह्यांत 300 ठिकाणी या योजनेचा लाभ पोचविण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 12 शहरात 80 ठिकाणी येत्या 15 दिवसांत जेवण उपलब्ध होईल, असेही राजे यांनी यावेळी सांगितले. "अन्नपूर्णा रसोई योजनेच्या माध्यमातून गरजवंतांना पाच रुपयांत पौष्टिक, गुणवत्तापूर्ण आणि खमंग नाष्टा आणि आठ रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे', अशी माहिती राजे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

देश

केरळमधील मुलाची आत्महत्या "ब्लू व्हेल'मुळेच तिरुवनंतपुरम : "ब्लू व्हेल' या गेममुळेच माझ्या मुलानं आत्महत्या केल्याचा दावा...

02.00 AM

कोलकता: वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) यंदा दुर्गा मूर्ती बनविण्याचा खर्च वाढला असून, बंगालमधील मूर्तिकारांना याचा फटका बसला आहे....

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

लखनौ : गोरखपूरमधील बाबा राघवदास रुग्णालयातील ऑक्‍सिजनची कमतरता हा गंभीर गुन्हा असून याप्रकरणी राज्य सरकार कोणालाही माफ करणार नाही...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017