काश्मीरमध्ये चंदगडच्या जवानाचा बर्फात गुदमरून मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

बर्फवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरून महादेव तुपारे यांचा मृत्यू झाल्याचे लष्कराकडून तुपारे यांच्या कुटुंबीयांना काल कळविण्यात आले. 

श्रीनगर : काश्मीरमधील लेह ते श्रीनगर दरम्यानच्या मार्गावर होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे दराज येथे महाराष्ट्रातील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाला आहे. बुधवारी (8 मार्च) ही घटना घडली. 

तुपारे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील आहेत. तुपारे यांच्या मृत्युमुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. बर्फवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरून महादेव तुपारे यांचा मृत्यू झाल्याचे लष्कराकडून तुपारे यांच्या कुटुंबीयांना काल कळविण्यात आले. 

लेह-श्रीनगर भागात प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने महादेव यांचे पार्थिव पोचविण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू आहेत. महादेव तुपारे हे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये सैन्यात 2005 साली भरती झाले होते. सैन्यात ते क्लार्क या पदावर कार्यरत होते. 
 

Web Title: mahadev tupare succumbs to death under snow