भारतातील आतापर्यंतचे भीषण रेल्वे अपघात

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

20 नोव्हेंबर 2016 : उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण जिल्ह्यातील पुखरायण येथे इंदोर-पाटणा एक्‍स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरल्याने 112 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, तर 200 हून अधिक जण जखमी.
 

20 नोव्हेंबर 2016 : उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण जिल्ह्यातील पुखरायण येथे इंदोर-पाटणा एक्‍स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरल्याने 112 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, तर 200 हून अधिक जण जखमी.

28 मे 2010 : पश्‍चिम बंगालमधील पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कटात ग्यानेश्‍वरी एक्‍स्प्रेस रुळावरून घसरल्याने सुमारे 148 लोकांचा मृत्यू.

9 सप्टेंबर 2002 : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात धवे नदीत हावडा-दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेसचा डबा बुडून झालेल्या अपघातात 100 ठार, तर 150 हून अधिक जखमी.

2 ऑगस्ट 1999 : आसाममधील गैसल येथे सुमारे अडीच हजार लोकांना घेऊन निघालेल्या दोन रेल्वेगाड्यांची धडक होऊन सुमारे 290 प्रवाशांचा मृत्यू.

26 नोव्हेंबर 1998 : पंजाबमधील खन्ना येथे फ्रंटियर मेलच्या घसरलेल्या डब्यांवर जम्मू तावी-सील्डाह एक्‍स्प्रेसची धडक बसून सुमारे 212 लोकांचा मृत्यू.

14 सप्टेंबर 1997 : मध्य प्रदेशमधील विलासपूर जिल्ह्यात अहमदाबाद-हावडा एक्‍स्प्रेसचे पाच डबे नदीत कोसळल्याने 81 जणांचा मृत्यू.

20 ऑगस्ट 1995 : उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद रेल्वे स्थानकाजवळ पुरुषोत्तम एक्‍स्प्रेसने कालिंदी एक्‍स्प्रेसला दिलेल्या धडकेत 400 जणांचा मृत्यू.

18 एप्रिल 1988 : उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे कर्नाटक एक्‍स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 75 जणांचा मृत्यू.

8 जुलै 1988 : केरळमधील अश्‍टमुंडी तलावात आइसलॅण्ड एक्‍स्प्रेस पडल्याने 107 जणांचा मृत्यू.

Web Title: major rail accidents in India