नौदलासाठी मलेशियाची चीनकडून जहाज खरेदी

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

क्वालालंपूर - नौदलासाठी मलेशिया चीनकडून जहाज खरेदी करणार आहे. पुढील आठवड्यात मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक बीजिंगला भेट देणार असून, त्या वेळी या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार असल्याचे मलेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने फेसबुकवर म्हटले आहे.

या संदर्भात मलेशियाचे संरक्षणमंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी या आधी फेसबुकवर माहिती दिली होती; परंतु संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितल्यानंतर माहिती मागे घेण्यात आली. नजीब रझाक हे पाच नोव्हेंबरला एक आठवड्याच्या दौऱ्यासाठी चीनला रवाना होणार आहेत. त्यांच्यासमवेत संरक्षण मंत्रालयाचे अधिकारीही असतील. चीनकडून घेण्यात येणाऱ्या या जहाजांवर क्षेपणास्त्र तैनात करण्यात येऊ शकणार आहेत. मलेशिया अशी एकूण दहा जहाजे खरेदी करणार असून, प्रत्येक जहाजाची किंमत 71.43 दशलक्ष डॉलर असेल.