मल्ल्या म्हणतात, 'मी निर्दोष'!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

नवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्या यांनी सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा निधी दुसरीकडे वळविल्याप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. न्यायालयीन सुनावणीतून माझ्या विरोधात काहीही निष्पन्न झाले नसल्याचे मल्ल्या यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्या यांनी सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा निधी दुसरीकडे वळविल्याप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. न्यायालयीन सुनावणीतून माझ्या विरोधात काहीही निष्पन्न झाले नसल्याचे मल्ल्या यांनी म्हटले आहे.

मल्ल्या यांनी ट्विटरवरून त्यांच्यावरील आरोपांबाबत खुलासा केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आतापर्यंत झालेल्या न्यायालयीन सुनावणीत किंगफिशर एअरलाइन्स आणि मी बॅंकांना नेमके किती पैसे देणे आहे, हे स्पष्ट झालेले नाही. प्रसारमाध्यमांनीच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधी मला दोषी ठरविले असून, त्याच्या इतर सर्वांवर प्रभाव पडत आहे. आपल्या देशात दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष असतो. तरीही मी बॅंकांचे पैसे बुडवून पलायन केले अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे बॅंकांचे काहीच देणे नाही.

भांडवली बाजार नियंत्रक संस्था "सेबी'ने 25 जानेवारीला मल्ल्या आणि अन्य जणांना भांडवली बाजारात बंदी केली आहे. त्यांनी युनाटडेट स्पिरिटस्‌ ही कंपनी दिएगो या कंपनीला विकण्याआधी तिचा निधी दुसरीकडे वळविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. युनायटेड स्पिरिटस्‌च्या संचालकपदाचा मल्ल्या यांनी मार्च 2016 मध्ये राजीनामा दिला होता.

देश

नवी दिल्ली: काँग्रेसच्या समन्वय केंद्राचे सदस्य आणि राहुल गांधींच्या निकटवर्ती वर्तुळातील मानले जाणारे आशिष कुलकर्णी यांनी...

07.24 AM

उच्च न्यायालयाचे आदेश; सहा आठवड्यांची मुदत अलाहाबाद: गोरखपूरमधील बाबा राघवदास रुग्णालयात ऑक्‍सिजनअभावी साठपेक्षा अधिक मुले मरण...

06.03 AM

नवी दिल्ली: वस्तू उत्पादनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) राज्यांनी कमी करावा, अशी...

05.03 AM