ममता बॅनर्जींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, या मागणीसाठी तृणमूल कॉंग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले असून, या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली.

या निर्णयाविरोधात तृणमूल कॉंग्रेसने सुरू केलेले आंदोलन आज सलग दुसऱ्यादिवशी सुरू असून, पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी या निर्णयाचा जोरदार निषेध केला. या वेळी काढण्यात आलेल्या मोर्चांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दिल्ली येथे राष्ट्रपतींची भेट घेतली. या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला अडचणींचा सामना करावा लागत असून, आम्ही सुरू केलेले आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे शहर विकासमंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितले. या निषेधार्थ उद्या राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

28 नोव्हेंबरला आयोजित मुख्य रॅलीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होण्याची शक्‍यता आहे. ममता यांनी काल दिल्लीतील मोर्चात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते.

Web Title: mamata meets president