'यूपी'तील परिस्थितीबाबत चिंता वाटते- बॅनर्जी

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

कोलकता- उत्तर प्रदेशमधील परिस्थितीबाबत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली. "तेथील सरकारने सर्वांसाठी काम केले पाहिजे. "सबका साथ, सबका विकास' ही घोषणा खऱ्या अर्थाने अमलात आणावी, असे आवाहन त्यांनी आज (मंगळवार) केले.

उत्तर प्रदेशमध्ये बेकायदा कत्तलखाने बंद करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्यानंतर राज्यातील मटण विक्रेत्यांनी सोमवारपासून बेकायदा बंद पुकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की उत्तर प्रदेशमध्ये सध्या जे काही घडत आहे त्याबद्दल आम्हाला चिंता वाटत आहे. जात-पात व धर्मावरून केल्या जाणाऱ्या भेदभावामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. आपण सर्व एक आहोत. सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलायचे नाही, तर करून दाखवायचे आहे.