विवाहसमारंभावेळी नृत्य करताना गोळीबार; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

आग्रा- फिरोजाबाद येथे विवाहासमारंभावेळी नृत्य करताना झालेल्या गोळीबारात एकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सनी यादव (वय 22) हा मित्राच्या विवाहासाठी फिरोजाबाद येथे गेलो हाता. मित्रासोबत तो स्टेजवर नृत्य करत असताना मोनू नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला. सनीच्या शरीरामध्ये गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.'

'सनी व मोनूमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागेवरून वाद सुरू होते. या वादातून गोळीबार झाल्याची शक्यता आहे. या घटनेबाबत वधू व वर पक्षांकडून अधिक माहिती घेत आहोत. मोनू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स