विमान अपहरणाबद्दल ई-मेल पाठविणारा अटकेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

हैदराबादः मुंबई पोलिसांना 15 एप्रिल रोजी विमान अपहरणाबाबत खोटी माहिती बाबत ई-मेल पाठविणाऱया एका व्यावसायिकाला आज (गुरुवार) अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. वामशी कृष्णा या व्यावसायिकाने 15 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांना ई-मेल पाठविली होती. मुंबई ते गोवा विमान अपहरणाबाबतची माहिती त्याने ई-मेलमधून दिली होती. त्याची मैत्रीण त्या विमानामधून प्रवास करणार होती. तिचा विमान प्रवास पुढे ढकलण्यासाठी त्याने हा बनाव रचला होता, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे.

वामशी हा विवाहीत असून, त्याला एक मुलगी आहे. त्याचा हैदराबादमध्ये वाहतुकीचा व्यावसाय आहे. फेसबुकवरून त्याची चेन्नई येथील रहिवासी असलेल्या महिलेशी मैत्री झाली आहे. दोघांना गोव्याला फिरायला जायचे होते. विमानाचे तिकीटही त्याने काढले होते. परंतु, गोव्यामध्ये फिरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्याला दौरा रद्द करायचा होता. यामुळे त्याने मुंबई पोलिसांना मुंबई, हैदराबाद व चेन्नई येथून उड्डाण घेणाऱया विमानाचे सहा जण अपहरण करणार आहेत, अशी चुकीची माहिती देणारा ई-मेल पाठविला होता. याबाबत पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.