शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण

Mandsaur: Farmers heckle collector
Mandsaur: Farmers heckle collector

मंदसोर - मध्य प्रदेशमधील मंदसोर जिल्ह्यात मंगळवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर आज (बुधवार) संतप्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांना मारहाण करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भेटीसाठी येण्याची मागणी करण्यात आली.

शेतकरी आंदोलनाचे मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. संतप्त शेतकऱ्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल व पोलिस दलावर दगडफेक केल्यानंतर शहरभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सीआरपीएफकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जखमी झाले. मात्र राज्याचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सीआरपीएफकडून गोळीबार करण्यात न आल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपये मदत जाहीर केली आहे.

आज सकाळी जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह संतप्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी बरखेडा येथे गेले असता त्यांना शेतकऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. शेतकऱ्यांनी मृत शेतकऱ्यांचे मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह म्हणाले, की आम्ही शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिलेले नाहीत. फक्त त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. 

मंदसोर-नीमच रस्त्यावर आज सुमारे हजारभर शेतकऱ्यांनी चक्काजाम केला. यानंतर 8 ट्रक व दोन दुचाकींना आग लावण्यात आली. मंदसोर येथे सोमवारपासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी मंदसोर येथे जाणार असून, मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com