मनमोहनसिंगांनी मोदींना विचारले हे 7 प्रश्न

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त आज (मंगळवार) मनमोहनसिंग यांनी गुजरात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयावरून सरकरला धारेवर धरले. यावेळी मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान मोदींना सात प्रश्न विचारले.

अहमदाबाद - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनमोहनसिंग यांनी नोटाबंदी ही सरकारची मोठी चूक असून ती एकप्रकारची संघटित लूट होती असे म्हटले आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त आज (मंगळवार) मनमोहनसिंग यांनी गुजरात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयावरून सरकरला धारेवर धरले. यावेळी मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान मोदींना सात प्रश्न विचारले.

मनमोहनसिंग यांनी विचारलेले प्रश्न :

  • 1) पंतप्रधानांनी स्वतःला विचारावे या निर्णयाने गरिबांना फायदा होणार आहे?
  • 2) नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतातील भूकबळी बंद होतील?
  • 3) नोटाबंदीच्या निर्णयावर सही करण्यापूर्वी विचार केला होता, की छोट्या उद्योगांचे काय होणार?
  • 4) या निर्णयामुळे नोकऱ्या गमाविलेल्यांचे काय होणार?
  • 5) नोटाबंदी, जीएसटीवर विचारले तर तुम्हाला कर चुकविणारे ठरविले जात आहे, हे योग्य आहे?
  • 6) बुलेट ट्रेनबाबत प्रश्न विचारले तर तुमच्यासाठी विकासाविरोधात बोलण्यासारखे आहे?
  • 7) बुलेट ट्रेनपूर्वी मोदींनी हायस्पीड रेल्वे गाड्या अपग्रेड करण्याबाबत विचार का केला नाही?