संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरला ; तिहेरी तलाकविरोधी विधेयक करणार सादर

Parliament
Parliament

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार असून, याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी मंगळवारी सांगितले. या अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक सादर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून हिवाळी अधिवेशन कधी होणार याबाबत चर्चा सुरु होत्या. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मोदी सरकारकडून हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकले जात असल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून केला जात होता. यावर स्पष्टीकरण देताना कुमार म्हणाले, "विरोधी पक्षांकडून काही गोष्टी विसरल्या जात आहेत. मात्र, त्यांच्या (काँग्रेस) कार्यकाळातही हिवाळी अधिवेशन 2008 आणि 2013 साली डिसेंबरमध्ये भरवण्यात आले होते, अशा शब्दांत काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या आरोपाला कुमार यांनी प्रत्युत्तर दिले. 

"गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसमधील नेते हताश झालेले नेत्यांकडून आरोप केला जात होता", असेही कुमार म्हणाले.
 
साधारणपणे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपते. मात्र, आता मोदी सरकारच्या कार्यकाळात डिसेंबर महिन्यात बोलावण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com