छत्तिसगढमध्ये तीन महिला नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

राजनंदगाव - छत्तिसगढमधील राजनंदगाव जिल्ह्यात नक्षलप्रभावीत भागात आज झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्यांत दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. त्यापैकी एक महिला वरिष्ठ कमांडर असून, तिला पकडून देणाऱ्यास आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.

नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम सुरू असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या वेळी नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या जंगलात पलायन केले. त्यानंतर राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत शस्त्रास्रे आणि तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.