शेफाली रंगनाथन सिएटलच्या उपमहापौर

वृत्तसंस्था
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

2001 मध्येच शेफाली या अमेरिकेत आल्या होत्या. त्यानंतर अमेरिकन विद्यापीठात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 

चेन्नई- वाहतूक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावल्यानंतर चेन्नईच्या 38 वर्षीय शेफाली रंगनाथन यांची अमेरिकेच्या सिएटल शहराच्या उपमहापौर पदी निवड झाली आहे.

रंगनाथन यांची नियुक्ती महापौर प्रबंधक जेनी दुरकान यांनी केली. "शेफाली नेहमी शाळा व कॉलेजमध्ये अव्वल होत्या. इथे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच शेफाली यांना वॉशिंग्टन डीसी'मध्ये पर्यावरण विषयावर काम करण्यासाठी अमेरिकन सरकारकडून ऑफर आली होती.

"वाहतूक क्षेत्रात तिने केलेली कामगिरी वाखणण्याजोगी आहे. तिचे हे यश देशातील व देशा बाहेरील तरुण मुलींना प्रेरणदायी ठरेल हे नक्की." अशी आशा शेफाली यांचे वडील प्रदीप रंगनाथन यांनी या नियुक्ती निमित्त व्यक्त केली. 2001 मध्येच शेफाली या अमेरिकेत आल्या होत्या. त्यानंतर अमेरिकन विद्यापीठात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 

शेफाली 2014-15 मध्ये मध्यवर्गीय कार्यकारी म्हणून ट्रान्सपोर्टेशन चॉइसेस कोलिशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. नंतर त्यांनी कार्यकारी संचालक म्हणूनही काम पाहिले.

 

Web Title: marathi news Chennai-born Shefali ranganathan Seattle deputy mayor