डोकलाममधील बांधकामे योग्यच; चीनकडून समर्थन

पीटीआय
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

बीजिंग : चीनने वादग्रस्त डोकलाम भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे योग्य असल्याचे म्हटले आहे. आमचे पाऊल योग्यच आहे आणि यामागे आमचे सैनिक तसेच आमच्या भागात राहणाऱ्या लोकांचा जीवनस्तर उंचावण्याचा हेतू असल्याचे चीनने म्हटले आहे. 

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोकलाममधील चीनच्या हालचालींवर भारत बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे म्हटले आहे. 

चीनने डोकलामच्या उत्तरी भागात 7 हेलिपॅड बनविल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये सशस्त्र वाहनेही दिसून आली. विशेष बाब म्हणजे, डोकलामच्या ज्या भागात संघर्ष निर्माण झाला होता, त्याच्या अतिशय जवळ चीन मोठ्या प्रमाणावर लष्करी इमारत बांधत आहे. चीनने याच वृत्तावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी याविषयी सांगितले, की उपग्रह छायाचित्रांवर आधारित वृत्त मीदेखील पाहिले आहे. अशी छायाचित्रे कशी मिळाली, याची मला माहिती नाही. यासंबंधी माझ्याकडे अधिक माहिती नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

या वृत्तांमुळे चीन पुन्हा एकदा भारताबरोबरच्या संघर्षाच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चिंता वाढली आहे. लु यांनी सांगितले, की डोकलामविषयी चीनची भूमिका स्पष्ट आहे. डोकलाम नेहमीच चीनचे प्रभावी अधिकार क्षेत्र राहिले आहे. या संदर्भात कोणताही वाद नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, डोकलाम हा आमचाच भूभाग असल्याचे चीन सातत्याने सांगत आले असून, या भागावर भूतानही आपला दावा करत आहे.

Web Title: marathi news Doklam Issue India China Border Indian army