खरिपाच्या पेरणीत लक्षणीय वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 जून 2017

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्य प्रदेशातील हिंसक आंदोलनापाठोपाठ अन्य राज्यांमध्येही आंदोलनाचे लोण पसरण्याची चिन्हे पाहता पेरण्यांवर विपरित परिणामांची शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र खरिपाच्या पेरणी क्षेत्राची माहिती येणे सुरू झाले असून, त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडे कृषी खात्याने जाहीर केले. 

खरिपाच्या पेरण्यांची प्राथमिक माहिती केंद्राकडे येणे सुरू झाले आहे. या माहितीनुसार आजअखेरपर्यंत 81.33 लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी हे क्षेत्र 72.31 लाख हेक्‍टर होते. 5.51 लाख हेक्‍टरमध्ये धानाची, तर 1.64 लाख हेक्‍टरमध्ये कडधान्याची पेरणी झाली आहे. मागील वर्षी या कालावधीत धानाचे क्षेत्र 4.52 लाख हेक्‍टर तर कडधान्याचे क्षेत्र 1.20 लाख हेक्‍टर एवढे होते. यंदा 47.39 लाख हेक्‍टरमध्ये उसाची आणि 14.06 लाख हेक्‍टरमध्ये कपाशीची लागवड झाली आहे. मागील वर्षी ऊस आणि कपाशीचे लागवड क्षेत्र अनुक्रमे 44.82 आणि 9.88 लाख हेक्‍टर होते. भरड धान्याचे क्षेत्रदेखील 3.89 लाख हेक्‍टरवरून 4.59 लाख हेक्‍टर झाले. तर तेलबियांचे क्षेत्र 94 हजार हेक्‍टरवरून 1.27 लाख हेक्‍टरवर पोचले आहे.