'सहारा समूहा'च्या अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणार 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : 'सहारा समूहा'च्या महत्त्वाकांक्षी 'अॅम्बी व्हॅली' प्रकल्पाचा लिलाव करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिले. यासाठी 37.392 कोटी रुपयांची आधारभूत किंमत ठरविण्यात आली आहे. 

या संदर्भात लिलावाचे अधिकार दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाने लिलावासाठी निविदा पाठविण्यासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. लोणावळ्यातील या प्रकल्पासाठी मॉरिशसस्थित 'आरपीएमजी' या गुंतवणूकदार कंपनीने गेल्या आठवड्यात 10 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रकल्पाची सध्याच्या बाजारभावानुसार एकूण किंमत एक लाख कोटी रुपयांहून अधिक असल्याचे 'सहारा समूहा'ची भूमिका आहे. 

अॅम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्यासाठी 'सहारा'चे प्रमुख सुब्रता रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयास विनंती केली होती. मात्र, ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. 'लिलाव रोखला, तरीही सुब्रता रॉय दीड हजार कोटी रुपयांचा दंड भरू शकतील असे दिसत नाही' असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. येत्या 7 सप्टेंबरपर्यंत 'सहारा'ने दीड हजार कोटी रुपये जमा केल्यास या विनंतीवर विचार केला जाईल, असेही न्यायालयाने सांगितले.