उत्तर प्रदेशमध्ये जन्माष्टमीचा सोहळा दणक्‍यात झाला पाहिजे : मुख्यमंत्री आदित्यनाथ 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

गोरखपूर : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बीआरडी रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. त्याचबरोबर, 'राज्यात कृष्णजन्माष्टमीचा सोहळा दणक्‍यात साजरा झाला पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी पुरेशी तयारी करावी' असे आदेशही त्यांनी दिले आहेत. 

गोरखपूरमधील बीआरडी रुग्णालयात प्राणवायूच्या सिलिंडरचा पुरवठा थांबल्यामुळे 60 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला. हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. या घटनेवरून देशभरातून राज्य सरकार आणि प्रशासनावर कडक शब्दांत टीका होत आहे. प्राणवायूच्या सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे अनेक महिन्यांचे बिल थकविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (रविवार) केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह बीआरडी रुग्णालयाला भेट दिली. 

या भेटीनंतर काही तासांमध्येच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जन्माष्टमीच्या सोहळ्याच्या तयारीसाठी पोलिस यंत्रणेला सूचना दिल्या. 'भारतीय परंपरांशी सुसंगत अशा स्वरूपात राज्यात भव्यदिव्य सोहळा झाला पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी तयारी करावी', अशा आशयाच्या या सूचना आहेत.