कमल हसन यांचे आरोप निराधार 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

कोईमतूर : तमिळनाडू राज्य सरकारवर ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप तमिळनाडूचे महापालिका प्रशासनमंत्री एस. पी. वेलूमणी यांनी शनिवारी फेटाळले. हसन यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन हे आरोप सिद्ध करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. 

वेलूमणी म्हणाले, ""सरकारच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे कमल हसन यांच्याकडे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. चित्रपटांसाठी भरलेल्या कराचे तपशील जाहीर करण्याची तयारीही हसन यांनी दाखवावी. याआधी कमल हसन अशा प्रकारचे बेताल आरोप करीत नव्हते. मात्र, मागील काही काळापासून त्यांनी पुराव्याशिवाय आरोप करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी कोणत्याही विषयावर बोलण्याआधी त्या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याची गरज आहे.'' 

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप कमल हसन यांनी केला होता.

दरम्यान, कमल हसन यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी, असे अण्णाद्रमुक (अण्णा) पक्षाचे नेते आणि लोकसभेचे उपाध्यक्ष एम. तंबीदुराई यांनी म्हटले आहे.