गोव्यातील दावे दिल्लीत हलविण्याविरोधात न्यायालयात याचिका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पणजी : पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडील गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली आहे. यासंदर्भात खंडपीठाने 5 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली असून त्यासंदर्भात पर्यावरण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.

गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केली होती. दरम्यान, पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या काही याचिकाकर्त्यांनी आज या खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल केली. हे दावे दिल्ली येथे हलविण्यास स्थगिती देण्याची विनंती या याचिकाकर्त्यांनी केली होती. पुढील सुनावणीपर्यंत हे दावे स्थलांतर करण्यास खंडपीठाने स्थगिती दिली.

गोव्यातील पर्यावरणासंदर्भात दावे पुणे येथून दिल्ली राष्ट्रीय हरित लवादाकडे हलविण्याचा आदेश काढल्यानंतर गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी नाराजी व संताप व्यक्त केला आहे. यामागे गोव्यातील हरित पट्टे नष्ट करण्याचा हा राजकीय डाव असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.