2019 मध्ये राम मंदिरच ठरणार भाजप-काँग्रेसमधील फरक : स्वामी 

subramanian swamy
subramanian swamy

नवी दिल्ली : गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा विजय मिळविण्याची किमया करणाऱ्या भाजपला 2019 मध्ये काँग्रेसकडून फारसे आव्हान मिळण्याची शक्‍यता नाहीच..! हा अंदाज वर्तविला आहे धडाकेबाज वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी! तसेच, गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अचानक मंदिर भेटींचा धडाका लावला होता. यावरही स्वामी यांनी टीकास्त्र सोडले. 

'2019 मध्ये सौम्य-बोगस हिंदुत्त्व + ढासळलेली अर्थनीती विरुद्ध खरेखुरे हिंदुत्त्व + भ्रष्टाचारविरोध अशीच लढाई असेल', असे भाकीत स्वामी यांनी वर्तविले आहे. राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीच्या आधी स्वीकारलेल्या 'सौम्य हिंदुत्त्वा'च्या भूमिकेवर कडाडून टीका करताना स्वामी यांनी 'राम मंदिर हा मुद्दाच दोन्ही पक्षांमधील फरक ठरेल' असेही म्हटले आहे. 

गुजरात निवडणुकीतील मतचाचणीच्या ताज्या कलानुसार, भाजपला स्पष्ट बहुमत मिळत आहे. मात्र, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी या निवडणुकीमध्ये 182 पैकी 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण भाजपची कामगिरी या लक्ष्याच्या जवळपास जाणारी नाही. 'गुजरातमध्ये भाजपला 95 च्या आसपास जागा मिळतील' असा अंदाज स्वामी यांनी यापूर्वी वर्तविला आहे. त्याचीही आठवण स्वामी यांनी करून दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com