पाकिस्तानच्या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू 

पीटीआय
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

जम्मू : पाकिस्तानच्या सैनिकांनी पुन्हा कुरापत काढून केलेल्या गोळीबारात सीमाभागातील दोन लहान मुलांना जीव गमवावा लागला. याशिवाय पाच नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. 

जम्मूमधील पूंछ जिल्ह्यातील सीमारेषेनजीक असलेल्या गावांना पाकिस्तानने आज (सोमवार) लक्ष्य केले. गोळीबारासह पाकिस्तानी सैन्याने उखळी तोफांचाही मारा केला. भारतीय जवानांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. 

सोमवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने सीमाभागातील डझनभर गावांवर गोळीबार सुरू केला. यात एका नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या गोळीबारात जखमी झालेल्या एका मुलीचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. 

दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार करण्यास सुरवात केली आहे. सुरक्षा दलांनी आज पहाटे असाच एक घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. हिवाळा सुरू होण्यापूर्वी घुसखोरी करण्याच्या प्रमाणात वाढ होत असते. सीमाभागातील अर्निया येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना अर्धवट तयार केलेला बोगदाही आढळून आला होता. 

'गेल्या चार महिन्यांत जवळपास 50 वेळा घुसखोरीचे प्रयत्न झाले. यापैकी 44 प्रयत्न सुरक्षा दलाने उधळून लावले आहेत. भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी झालेल्या काही दहशतवाद्यांना नंतर चकमकीमध्ये ठार करण्यात आले', अशी माहिती जम्मू-काश्‍मीरचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मलसिंह यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.