वीरभद्रसिंहच हिमाचलचे मुख्यमंत्री होणार : राहुल 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मंडी : गुजरातचे इकॉनॉमिक मॉडेल बड्या उद्योगपतींसाठी आहे, सामान्यांना त्याचा काहीही उपयोग नाही. भाजप सरकारच्या धोरणामुळे गुजरातमध्ये तीस लाख युवकांची नोकरी गेली असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून राहुल गांधी सध्या हिमाचलच्या दौऱ्यावर आहेत. ते मंडी येथे आयोजित सभेत बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले की, वीरभद्र सिंह हे सातव्यांदा मुख्यमंत्री होतील. वीरभद्र हे राजा नाहीत गरीब आहेत, ते मनापासून काम करतात. राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका करताना म्हटले, की चीनमध्ये दररोज 50 हजार युवकांना रोजगार मिळतो, तर भारतात केवळ 450 जणांना नोकरी मिळत आहे.

गुजरात सरकारने 13 हजार शाळा बंद केल्या. मोदी केवळ मोठमोठे भाषणे देतात, आश्‍वासने देतात. मोदी यांना खरे आणि खोट्यामधील फरकच ठाऊक नाही, असेही राहुल म्हणाले. हिमाचल सरकार एक हजार रुपये बेरोजगार भत्ता देत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी दररोज आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे, त्या राज्यात कोणता ना कोणता शेतकरी गळफास घेत आहे. हिमाचल सरकारने पाच वर्षांत 4 नवीन मेडिकल कॉलेज सुरू केल्याची माहिती राहुल यांनी दिली.