आता इंटरनेटसाठीही 'आधार' आवश्यक

Aadhar Card
Aadhar Card

नवी दिल्ली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड सध्या बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर आता इंटरनेट वापरासाठीही आधारकार्ड आवश्यक करण्यात आले आहे. ज्या इंटरनेट ग्राहकांकडे आधारकार्ड क्रमांक नसेल, अशा ग्राहकांची इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता इंटरनेटची सेवा पुरवण्यापूर्वी ग्राहकांकडून त्यांचा युनिक आयडेंटिटी क्रमांकाचा तपशील मागणार आहेत. त्यामुळे यापुढे आधार क्रमांकाशिवाय कोणत्याही ग्राहकाला इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. तसेच यापूर्वी मोबाईल क्रमांक, गॅस क्रमांक, रेल्वे आरक्षण यांसारख्या योजनांसाठी आधार क्रमांक आवश्यक करण्यात आला होता. त्यानंतर आता इंटरनेट वापरकर्त्यांनी लवकरच आधार क्रमांक लिंक करावा, असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, हरवलेल्या सामानाचा शोध घेणे सोपे व्हावे, यासाठी ऑनलाईन विक्री करणारी वेबसाइट अॅमेझॉनकडून ग्राहकांना कोणत्याही वस्तूची ऑर्डर करतेवेळी आधार क्रमांकाची नोंदणी करण्यास सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com