ब्राम्होसची चाचणी यशस्वी

brahmos
brahmos

नवी दिल्ली : जगातील सर्वात वेगवान अशा सुपरसॉनिक क्रूज मिसायल ब्राम्होस या क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी झाली. भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय यांच्या लढाऊ पहिल्यांदा यशस्वीपणे परीक्षण केले.  

या क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. यशस्वी प्रक्षेपणास्त्रामुळे एकदा कमांड दिल्यानंतर शेकडो किलोमीटरपर्यंत हे अंतर कापू शकते. या क्षेपणास्त्राची अपेक्षित रेंज ही 300 किलोमीटरपर्यंत असेल. या क्षेपणास्त्राची गुरुत्वाकर्षण ही एक सुखोई-30 या लढाऊ विमानासारखे असेल. 

भारतीय नौदल आणि लष्कराने यापूर्वी विविध क्षेपणास्त्रावर काम केले. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून 500 किलोमीटरपर्यंत अंतर सहज पार होऊ शकते. नौदल आणि लष्कर हे क्षेपणास्त्र आकार आणि वजनाने तीन टन असेल. हवाई दलाने केलेल्या चाचणीत या क्षेपणास्त्राचे वजन 2.5 टन आहे. 

ब्राम्होस हे क्षेपणास्त्र 1500 किलोमीटर समुद्रापासून लक्ष्य करता येऊ शकते. ब्राम्होस हे आताच्या क्षेपणास्त्रापेक्षा अत्यंत अवघड असे वाटत आहेत. ब्राम्होस क्षेपणास्त्राचे नाव इंडो-रशिया यांच्या संयुक्त अशा मोस्को आणि ब्रम्हपुत्रा नदीपासून ठेवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com