हरियानात 6 वर्षांच्या बालिकेवर अमानुष अत्याचार

Rape
Rape

हिसार : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिल्लीतील 'निर्भया' सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता असाच संतापजनक प्रकार शनिवारी हिस्सारच्या उकलाना गावात घडला. एका 6 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची अमानुष हत्या केल्याचे उघडकीस आले.

हिस्सारच्या उकलाना भागात बालिकेचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. घरापासून काही मीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला. या बालिकेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगामध्ये लाकडी काठी घुसवून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, संतप्त जमावाकडून परिसरातील बाजारपेठा बंद पाडण्यात आल्या.  

याप्रकरणी अज्ञातांविरोधात उकलाना पोलिस स्थानकात कलम 302 (खून), 376 (बलात्कार) आणि 363 (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हेगारांना येत्या 48 तासांत जेरबंद केले जाईल. या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, या ठिकाणी पथदिवे नसल्याने आरोपींचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली जाईल, असे हिस्सारचे पोलिस उपअधीक्षक जितेंद्रकुमार यांनी दिली. 

याबाबत पोलिस अधीक्षक मनिषा चौधरी यांनी सांगितले, की ''पीडित बालिकेचे कुटुंबीय सपेरा समाजातील असून, ते हिस्सार भागात गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. प्रथमदर्शनी बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसत आहे. आम्ही शवविच्छेदनाचा अहवालाची वाट पाहत आहोत. अहवाल आल्यानंतर याबाबतची पूर्ण माहिती कळेल''. 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com