प्रचारासाठी मोदींकडून सी-प्लेनचा वापर

modi seaplane
modi seaplane

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती नदीतून सीप्लेन वापर केला. सुरक्षेच्या कारणास्तव रोड शोसाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याने अखेर त्यांनी सीप्लेनच्या माध्यमातून जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एन181केक्यू या सीप्लेनची मदत घेतली.

विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांना रोड शो करायचा असल्याने यासाठी त्यांनी प्रशासनाकडून परवानगीही मागितली होती. मात्र, ज्या भागात या नेत्यांची सभा होणार आहे, ते ठिकाणी मोठ्या गर्दीचे असल्याने या ठिकाणी कायदा आणि सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी त्यांच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली होती. 

मात्र, पंतप्रधान मोदींनी प्रचारासाठी हायटेक सीप्लेनचे माध्यम निवडले. त्यांनी साबरमती नदी येथे उतरून धरोई डॅमपर्यंत सी-प्लेनने प्रवास केला. अशाप्रकारचा प्रवास करणारे मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या सी-प्लेन प्रवासाची चर्चा आता सगळीकडे सुरु आहे. मोदी आज दुपारी अंबाजी माता मंदिरात दर्शन घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com