narendra modi
narendra modi

काँग्रेसने गोरगरिबांना आयुष्यभर लुटले ; पंतप्रधानांचा हल्लाबोल

गांधीनगर : काँग्रेसच्या नेत्यांनी गोरगरिबांना आयुष्यभर लुटले. त्यांनी आत्तापर्यंत जनतेची खूप लूट केली आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. तसेच काँग्रेसचा जीएसटी म्हणजे 'ग्रँड स्टुपिड थॉट' आहे. अशाप्रकारे जीएसटीची अंमलबजावणी झाली असती तर गरिबांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरही 18 टक्के इतका कर आकारला गेला असता, असेही ते म्हणाले.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. काँग्रेसकडून विकासाच्या मुद्यावरून मोदी सरकारवर अनेकदा टीका केली जात आहे. याचा समाचार मोदींनी यावेळी घेतला. ते म्हणाले, काँग्रेससाठी विकासाचा अर्थ हँडपंप असा आहे. तर भाजपसाठी विकासाचा अर्थ जलवाहिन्यांची कामे करणे हा आहे. काँग्रेसचा जीएसटी म्हणजे ग्रँड स्टुपिड थॉट आहे. अशाप्रकारे जीएसटीची अंमलबजावणी झाली असती तर गरिबांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरही 18 टक्के इतका कर आकारला गेला असता. तसेच सिगारेट आणि मद्यावर 18 टक्के कर लागू केला असता. त्यामुळे सिगारेट आणि मद्य स्वस्त झाले असते.

तसेच ते पुढे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी गोरगरिबांना आयुष्यभर लुटले. त्यांनी आतापर्यंत जनतेची खूप लूट केली आहे. त्यामुळे त्यांचा जीएसटीला विरोध करणे स्वाभाविक आहे. मात्र, जनतेला इतक्या वर्षात त्यांच्याकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com