'ईडी'कडून कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर छापा

karti chidambaram
karti chidambaram

नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने शनिवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याशी निगडित दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. एअरसेल-मॅक्सिस खटल्यातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही छापेमारीची कारवाई करण्यात आली.

केंद्रीय तपास संस्थेने मागील वर्षी 1 डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम यांच्या मालकीशी संबंधित मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात येत आहे. कार्ती चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून समन्स बजावण्यात येणार होेते. कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित आयएनएक्‍स मीडिया फर्ममधील परकी गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप कार्ती यांच्यावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com