बलात्कारातील आरोपींची जमावाकडून हत्या

National News Crime News Rape Accused Mob hit 2 dead
National News Crime News Rape Accused Mob hit 2 dead

गुवाहटी : बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यावर लगाम लावण्यासाठी सरकारकडून कायद्याची अंमलबजवणी केली जात आहे. बलात्कार करणाऱ्या नराधमांना जमावाकडून अनेकदा मारहाणही केली जाते. असाच प्रकार अरुणाचल प्रदेशमध्ये घडला. येथील जमावाने बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींना पोलिस ठाण्यातून बाहेर काढून नेऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघा आरोपींचा मृत्यू झाला. 

येथील तेझू गावातील एका पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या पाच दिवसांनी तिचा मृतदेह सापडला होता. तिच्यावर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी संजय सोबोर (३०) आणि जगदिश लोहार (२५) या दोघांना अटक केली होती. या दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर शेकडो जणांचा जमाव पोलिस ठाण्यावर येऊन धडकला. या संतप्त जमावाने आरोपींना पोलिस कोठडीतून बाहेर काढले आणि मारहाण करत बाजारपेठेपर्यंत आणले. त्यानंतर दोघांना अमानुष मारहाण केली गेली. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे मृतदेह मुख्य चौकात सोडून जमाव तिथून निघून गेला. 

दरम्यान, पोलिस ठाण्यात कर्मचारी ड्यूटीवर होते. मात्र, पोलिसांचे संख्याबळ अपुरे असल्याने जमावाच्या हल्ल्यात पोलिसही जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com