आता वऱ्हाड निघणार रेल्वेने...

National News Indian rail Marriage Relatives travel by train
National News Indian rail Marriage Relatives travel by train

नवी दिल्ली : "वऱ्हाड निघालयं रेल्वेने' असे म्हणणे आता प्रत्यक्षात येऊ शकेल. कारण रेल्वेने लग्नाच्या वऱ्हाडासाठी वातानुकूलित कक्षाची ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी एकूण तिकीट दराच्या पाच पट आणि 30 टक्के सेवा कर जादा भरावा लागेल. शैक्षणिक सहली व तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठीही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे रेल्वेच्या नुकत्याच जारी केलेल्या नियमावलीत म्हटले आहे. मात्र, संसदीय अधिवेशनकाळात वा अन्य वेळीही राजकीय पक्ष संघटनांच्या मोर्चांकरिता झुंडींनी येणाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध होईल का, याचा खुलासा यात नाही. 

लग्नासाठी किंवा वरील दोन कारणांसाठी संपूर्ण वातानुकूलित डबा आरक्षित करायचा असेल, तर एकूण तिकीट दराच्या पाच पट जादा दर व 30 टक्के सेवा करही लावाल जाईल. 18 डब्यांची अख्खी गाडीच आरक्षित करायची असेल, तर सुरक्षा अधिभारापोटी 50 हजार रुपये संबंधितांना ऑनलाइन बुकिंगवेळीच आगाऊ भरावे लागतील. 

सध्या अशा पद्धतीने स्पेशल डब्यांचे आरक्षण करायचे असेल, तर संबंधित स्थानकांच्या स्टेशन मास्तरकडे किंवा मुख्य बुकिंग व्यवस्थापकाकडे जावे लागते. शिवाय प्रवास सुरू होण्याच्या ठिकाणची माहिती व प्रवाशांची माहितीही द्यावी लागते. ही सारी कागदी फायलींची जुनी यंत्रणा होती. त्यात संबंधितांचा वेळ व कष्ट वाया जात असत. ती बदलण्याची मागणी रेल्वेतूनच होत होती. पीयूष गोयल यांच्या काळात रेल्वे मंडळाने ती मार्गी लावली आहे. आता हे एकगठ्ठा ऑनलाइन आरक्षण एक खिडकी प्रणालीद्वारे ऑनलाइन करणे शक्‍य होईल. 
 

तक्‍त्यांऐवजी डिजिटल प्लाझ्मा स्क्रीन 

गाडी जेथून सुटते त्या रेल्वे स्थानकावर प्रत्येक डब्यावर तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांची नावे असलेला तक्ता सध्या लावण्यात येतो. मात्र, दोन-तीन स्थानकांनंतर त्या तक्‍त्याची लक्तरे झालेली असतात व नंतर तो दिसेनासाच होते. कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी डिजिटल प्लाझ्मा संचावर या साऱ्या कन्फर्म तिकीटधारी प्रवाशांची नावे झळकणार आहेत. या स्क्रीनवर प्रवाशांना तिकीट आरक्षणाबाबतची सारी माहिती मिळेल. मुंबई सेंट्रल, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, हावडा, चेन्नई सेंट्रल आदी निवडक स्थानकांवर सुरू झालेला हा प्रयोग आता देशभरातील "ए-1', "ए' व "ई' वर्गातील व नंतर सर्व स्थानकांवर सहा महिने चाचणी व नंतर कायम राबविण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com