पंतप्रधान, अर्थमंत्र्यांच्या मदतीनेच कर्ज गैरव्यवहार : राहुल गांधी

National News Loan Fraud Rahul Gandhi
National News Loan Fraud Rahul Gandhi

अथणी (बेळगाव) ः एकीकडे देशात शेतकऱ्यांना मदत करण्यास केंद्र सरकारकडे पैसे नाहीत, तर दुसरीकडे बॅंकांचे रोज नवे गैरव्यवहार बाहेर येत आहेत. नीरव मोदीसारख्या एका उद्योजकाने बॅंकेकडून कर्जरूपाने 11 हजार कोटी पळविले. बॅंकांचे मोठे गैरव्यवहार हे पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या मदतीशिवाय होणे शक्‍यच नाही, असा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (ता. 24) केला. राहुल गांधी यांनी तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्याला बेळगाव जिल्ह्यातील अथणीतून आज प्रारंभ केला, या वेळी आयोजित जनआशीर्वाद यात्रेच्या सभेत ते बोलत होते. 

गांधी पुढे म्हणाले, ""कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर असताना एक मुख्यमंत्री व चार मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले. त्यातीलच एक असलेल्या येडीयुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली मोदी व अमित शहा यांचा पक्ष येथील निवडणूक लढविणार आहे. एकीकडे स्वच्छ कारभाराची पोकळ आश्‍वासने द्यायची आणि जेलमध्ये जाऊन आलेल्यांवर विश्‍वास दाखवायचा, हे लोकांना कळून चुकले आहे.

भाजप अध्यक्षांच्या मुलाच्या गैरव्यवहारावर कोणी बोलायला तयार नाही. उलट कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार विकसनशील व पारदर्शी आहे. भाजप "मन' की, तर कॉंग्रेस "काम की बात' करते. देशाला सर्वांना सोबत व विकासाकडे नेण्यासाठी कॉंग्रेसची गरज आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com