'मॅगी'वरून नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड

maggi
maggi

लखनऊ : नेस्ले इंडियाचे उत्पादन असलेल्या मॅगीची लॅब टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये मॅगी पुन्हा एकदा फेल झाल्याने नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना हा दंड ठोठावला आहे. कंपनीसह तीन वितरकांना 15 तर दोन विक्रेत्यांना 11 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वी 2015 साली मॅगीची 20 विविध प्रकारची चाचणी घेतली होती. यापैकी पाच चाचण्यांमध्ये मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळले होते. याशिवाय भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा मानक प्राधिकरणानेही नेस्ले कंपनीच्या नऊ प्रकारच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती. मात्र, नंतर मॅगीचे सर्व नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व चाचणीमध्ये मॅगी नूडल्स यशस्वी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात सशर्त बंदी उठवली होती. 

याबाबत नेस्ले इंडियाचे प्रवक्ते म्हणाले, अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेली ऑर्डर आम्हाला अद्याप मिळालेली नाही. मात्र, हे नमुने 2015चे असून, यामध्ये शिशाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, पुन्हा केलेल्या मॅगीच्या चाचणीतही शिशाचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असून, सेवनासाठी अपायकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नेस्लेच्या मॅगीला 45 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com