'ते' रंगीत फुगे लवकरच फुटणार : पनीरसेल्वम 

National News Politics Panirselvam Criticizes
National News Politics Panirselvam Criticizes

चेन्नई : तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी आज अभिनेते कमल हसन आणि रजनीकांत यांना लक्ष्य करत जोरदार टीका केली. कमल हसन व रजनीकांत हे अभिनेते म्हणजे रंगीबेरंगी फुगे असून, ते लवकरच फुटतील, असा टोला तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी अप्रत्यक्षरित्या लगावला. 

"अण्णाद्रमुक'च्या कार्यालयात दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. पनीरसेल्वम म्हणाले, ""अण्णाद्रमुक पक्षाचा पराभव व्हावा, असे काही जणांना अगोदरपासून वाटत होते. आता त्यात नव्याने काहींची भर पडली आहे. मात्र, लवकरच तेही नाहीसे होतील. अशा पक्षांच्या पाठीमागे जे लोक आहेत. ते मेकअप करून स्वत:ला प्रामाणिक असल्याचे भासवित आहेत.'' 

अण्णाद्रमुकचा पराभव करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते आता निराधार फुगे बनले असून, आता त्यात काहींची नव्याने भर पडली आहे. हे रंगीबेरंगी फुगे राजकीय क्षितिजावर आज उडताना दिसत आहेत. ते दिसायला जरी चांगले असले तरी, ते फारकाळ टिकणार नाहीत. ते लवकरच फुटून खाली कोसळतील, अशी टिप्पणी पनीरसेल्वम यांनी या वेळी केली. 
दरम्यान, काही जण पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पनीरसेल्वम यांनी टीटीव्ही दिनकरन यांचे नाव न घेता केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com