'त्या' टि्वटवरुन परेश रावल यांचा माफीनामा

paresh rawal
paresh rawal

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे विद्यमान खासदार परेश रावल यांनी ''बारवालापेक्षा आपला चायवाला चांगला आहे'' असे ट्विट केले. या ट्विटवरुन काही वादंग निर्माण होण्यापूर्वी त्यांनी ते टि्वट काही तासांतच काढून टाकले. तसेच त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची माफी मागतो, असे रिट्विट केले.

भारतीय युवक काँग्रेसच्या ऑनलाईन मासिक 'युवा देश' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या संभाषणातील छायाचित्र रावल यांनी ट्विट केले होते. यावर त्यांनी ''आपला चायवाला हा बारवाल्यापेक्षा कधीही चांगला आहे'' असे ट्विट केले होते. विरोधकांनी ते ट्विट प्रसिद्ध केल्यानंतर रावल यांनी काही तासांतच ते ट्विट काढून टाकले. 

ते टि्वट काढून टाकल्याचे रिट्विट करून त्यांनी पुन्हा सांगितले. ''मी ते ट्विट काढून टाकले असून, या टि्वटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यांची मी माफी मागतो''.

दरम्यान, काँग्रेसने त्यांच्या ऑनलाईन मासिकाच्या हँडलवरून केलेले ट्विट काढून टाकले आहे. तसेच काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि राजकीय विरोधकांचा नेहमी सन्मान केला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com