पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसकडून तक्रार दाखल

EC
EC

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज (गुरूवार) सकाळपासून सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, पंतप्रधान मोदींनी मतदानानंतर केलेल्या रोड शोविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

मोदींनी मतदान केल्यानंतर 300 मीटरचा 'मिनी रोड शो' केला. त्यांच्या या रोड शोवर काँग्रेसने आक्षेप घेतला. मोदींनी रोड शोमध्ये लोकांची भेट घेतली. ही बाब आचारसंहितेचे भंग करणारी आहे, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

निवडणूक आयोगावर काँग्रेसने जोरदार टीकास्त्र सोडले. ''निवडणूक आयोग हे पंतप्रधानांच्या सचिवासारखे काम करत आहे. आयोगाने डोळे बंद केले आहे. निवडणूक आयोग मूकदर्शक बनला आहे'', अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.

गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दुपारी बारापर्यंत 39 टक्के इतके मतदान पार पडले आहे. मतदानासाठी 14 जिल्ह्यातील 14,523 ठिकाणांवर 25,515 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये बनसकंठा, पटन, साबरकांथा, मेहसाना, गांधीनगर, अहमदाबाद, अहवल्ली, महिसागर, पंचमहल, दाहोड, खेडा, आनंद, वडोदरा आणि छोटा उदेपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. 

दरम्यान, काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग यावर काय कारवाई करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com