रजनीकांतची राजकारणात 'एंट्री' लवकरच होणार

Rajnikant
Rajnikant

धर्मपुरी : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यावर रजनीकांत यांचे बंधू सत्यनारायण राव गायकवाड यांनी रजनीकांत यांची येत्या जानेवारी महिन्यात राजकारणात 'एंट्री' होणार असल्याचे संकेत आज (बुधवार) दिले. 

रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार आहेत, अशा चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र, त्यावर रजनीकांत यांनी उघडपणे आपले मत व्यक्त केले नाही. त्यामुळे मध्यंतरी त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबतच्या चर्चा काही कालावधीसाठी थांबल्या होत्या. त्यानंतर आता त्यांचे बंधू सत्यनारायण राव यांनी रजनीकांत राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच रजनीकांत आपल्या राजकारणातील प्रवेश आणि राजकीय पक्षाची घोषणा जानेवारीमध्ये करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, रजनीकांत नेमक्या कोणत्या पक्षात जाणार किंवा ते एखाद्या नव्या पक्षाची स्थापना करणार का, याकडे त्यांच्या चाहत्यांसह इतर राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com