मोदींच्या प्रचारातील 'ते' सी-प्लेन कराचीतील

Sea Plane
Sea Plane

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काल (मंगळवार) सी-प्लेनचा वापर केला. मोदींनी प्रचारात वापरलेले सी-प्लेन हे पाकिस्तानच्या कराचीतील असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोदींच्या प्रचारसभेची चर्चा सुरू झाली आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी प्रचारासाठी काल एन181केक्यू या सी-प्लेनचा वापर केला होता. या सी-प्लेनच्या वापरामुळे त्यांची प्रचारसभा विशेष लक्षवेधी ठरली. मात्र, त्यांनी प्रचारसभेत वापरलेले एन181केक्यू हे सी-प्लेन 3 डिसेंबरला कराचीहून भारतामध्ये आणण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा सी-प्लेनचा प्रचार वादाचा विषय ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.  

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी वापरलेले हे एन181केक्यू हे विमान कराचीचे असून, या विमानाची नोंदणी अमेरिकेत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com