अबब! पोटातून निघाला चक्क स्टीलचा ग्लास 

glass
glass

सतना : शस्त्रक्रिया करुन विविध आजार बरे झाल्याचे आपण आत्तापर्यंत अनुभवले असलेच. मात्र, आता एका व्यक्तीची पोटाची शस्त्रक्रिया केली असता यादरम्यान चक्क स्टीलचा ग्लास बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे डॉक्टरांसह नातेवाईकांना धक्काच बसला आहे. मध्य प्रदेशातील सतना येथे ही घटना घडली.

55 वर्षीय व्यक्तीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी एक्स-रे काढायला सांगितले. एक्स-रे काढल्यानंतर पोटात स्टीलचा ग्लास असल्याचे आढळले. असे काही पोटात असेल याची कोणतीही कल्पना नसल्याने सगळेच भयभीत झाले. त्यानंतर त्याच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या पोटातून एक स्टीलचा ग्लास बाहेर काढण्यात आला. 

''रुग्णाला पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक्स-रे काढल्यावर पोटात ग्लास असल्याचे निर्देशनास आले. हा ग्लास त्यांच्या पोटात गेला कसा, हे समजू शकले नाही'', अशी माहिती डॉक्टर सार्थक अग्रवाल यांनी दिली. तसेच ग्लास पोटात गेला कसा, याबाबत डॉक्टरांनी विचारले असता त्या रुग्णाने ते सांगण्यास नकार दिला.

दरम्यान, यापूर्वी मध्य प्रदेशातीलच एका रुग्णाच्या पोटातून काही दिवसांपूर्वी 5 किलो लोखंड, काचा ब्लेडस्, साखळी, 263 मिळाल्याचे आढळले होते. त्यानंतर आता ही घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com