'देशवासीयांना लवकरच गरिबी पाहावी लागेल'

यशवंत सिन्हा
यशवंत सिन्हा

नवी दिल्ली : 'आपण गरिबीत दिवस काढले आहेत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींच्या अर्थमंत्र्यांमुळे मात्र देशातील जनतेला लवकरच जवळून गरिबी पहावी लागेल असे दिसत आहे. मंदीच्या काळात नोटाबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतले,' अशी सणसणीत टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर केली.

ज्येष्ठ नेते सिन्हा यांनी भाजप सरकारलाच कानपिचक्या दिल्यामुळे पक्षामध्ये एकच खळबळ माजली आहे. यशवंत सिन्हा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात याबाबत भाष्य करणारा लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा खरपूस समाचार घेतला आहे. मंदीचा काळ सुरू असताना नोटाबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतले असे त्यांनी म्हटले आहे. आपण गरिबी अत्यंत जवळून पाहिलीय, सोसलीय असा दावा पंतप्रधान मोदी करतात. त्यामुळे कदाचित देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पाहावी, यासाठी त्यांचे अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करत आहेत, असा टोला सिन्हा यांनी अरुण जेटली यांना लगावलाय.

जेटलींनी वाट लावली
देशाच्या अर्थव्यवस्थेची जेटली यांनी जी अवस्था करून ठेवलीय, त्यावर मी आता बोललो नाही तर ते माझ्या देशाशी प्रतारणा केल्यासारखे होईल. परंतु, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपमधील अनेक नेते सहमत होतील, हे मला माहिती आहे. भीतीमुळे ते नेते बोलत नाहीत. खासगी गुंतवणुकीत जितकी घसरण झालीय, तितकी गेल्या दोन दशकात झालेली नाही. औद्योगिक उत्पन्नाची स्थिती बिकट आहे, कृषी क्षेत्रातही समस्या वाढल्यात. रोजगार उपलब्ध करणारे उद्योगधंदेही संकटात आहेत. नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. त्याचवेळी, जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भयावह स्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार होत आहे, असं सिन्हा यांनी या लेखात नमूद केलं आहे. 

पहिल्या तिमाहीत विकास दर घसरून ५.७ टक्के झाला. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण आहे. सरकारचे प्रवक्ते म्हणतात, नोटाबंदीमुळे मंदी आली नाही, असे सांगत देशाच्या विकासदराच्या मुद्द्यावरून होत असलेल्या घसरणीवरून सिन्हा यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com