सशस्त्र दल ध्वजाला सलाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

आपल्या शूर अपंग सैनिकांच्या पुनर्वसन आणि कल्याणासाठी हे देशातील प्रत्येक नागरिकाचे सामुहीक कर्तव्य आहे. ध्वज दिन आपल्याला सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी सर्वात उदारपणे योगदान देण्याची संधी देत आहे. 

नवी दिल्ली - आज (ता.7) नवी दिल्ली येथे सशस्त्र दल ध्वज दिन सोहळा पार पडला. गेल्या आठवडाभर देशात संरक्षण मंत्रालयाकडून सशस्त्र दल ध्वज दिन सप्ताह राबविला गेला. माजी सैनिक व हुतात्मा झालेल्यांच्या विधवा आणि मुलांना आर्थिक पाठींबा देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात डिजीटल अभियान राबविले.

1949 पासून 7 डिसेंबरला सशस्त्र दल ध्वज दिन साजरा केला जातो. सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी (एएफएफडीएफ) योगदान प्राप्त करण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाकडून व्यापक डिजीटल मोहीम ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राबवली गेली आहे. आज (ता.7) या मोहीमेचा शेवटचा दिवस आहे. आपल्या शूर अपंग सैनिकांच्या पुनर्वसन आणि कल्याणासाठी हे देशातील प्रत्येक नागरिकाचे सामुहीक कर्तव्य आहे. ध्वज दिन आपल्याला सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी सर्वात उदारपणे योगदान देण्याची संधी देत आहे. 

या दिनानिमित्त आर्थिक पाठींबा देण्यासाठी लोक यूपीआय कोड, पेटीएम आणि नेटबँकींगचा उपयोग करून फंडमध्ये योगदान देऊ शकतील. या मोहीमेमुळे लष्कराप्रती आपले सहकार्य व एकता दर्शविण्यास मदत होईल. हा ध्वज सर्व सरकारी कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. तो ध्वज सन्मानाने परिधान करण्याचे आवाहन संरक्षण मंत्रालयाने भारतीयांना केले आहे. 

असे करा आर्थिक सहाय्य -

  • यूपीआय कोड, पेटीएम आणि नेट बँकिंगचा उपयोग करून लोक सशस्त्र दलाच्या सैनिकांना दान करू शकतात.
  • UPI वरून फंडमध्ये योगदान करण्यास armedforcesflagdayfund@sbi हा कोड राहील.
  • देणगीसाठी वापरला जाणारा पेटीएम क्रमांक 8800462175 हा आहे.
  • या व्यतिरिक्त, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगसाठी ksb.gov.in/armed-forces-flag-day-fund.htm वर लॉग ऑन करु शकता. 
Web Title: Marathi news_Armed Forces Flag Day 2017