मेघालयमध्ये संगमांना सत्तास्थापनेचे निमंत्रण

sangma
sangma

शिलॉंग - नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) प्रमुख कॉनराड संगमा यांना मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यंनी सोमवारी राज्यात सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिले. संगमा यांनी स्वत: ही माहिती देताना नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या (मंगळवारी) होईल असे सांगितले.

माझ्याकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे राज्यपालांनी मला सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले, असे संगमा यांनी स्पष्ट केले. शनिवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून, यामध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसने 59 पैकी 21 जागा जिंकल्या असून, बहुमतासाठी त्यांना दहा जागा कमी पडल्या. एनपीपीला 19 जागा मिळाल्या असून, संगमा यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेऊन 34 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर करत सरकार स्थापण्याचा दावा केला.

आम्ही राज्यपालांना भेटलो असून, त्यांना 34 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिले आहे. यामध्ये एनपीपीचे 19, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (यूडीपी) सहा, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे (पीडीएफ) चार, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (एचएसपीडीपी) आणि भाजपचे प्रत्येकी दोन, तसेच एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे, अशी माहिती संगमा यांनी दिली. कॉनराड संगमा हे माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे पुत्र आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com