MeToo: एम. जे. अकबर यांचा अब्रुनुकसानीचा दावा

MeToo: एम. जे. अकबर यांचा अब्रुनुकसानीचा दावा

नवी दिल्ली- भाजप नेते केंद्रिय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी #MeToo प्रकरणात पाटियाला हाऊस न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एम. जे. अकबर यांच्यावर एका महिला पत्रकाराने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. कलम 499, 500 अंतर्गत त्यांनी दावा दाखल केला आहे.

तत्पूर्वी, अकबर परदेशातून काल (ता.14) भारतात परतले होते. देशभरात व्यापक स्तरावर सुरु असलेल्या #MeToo अभियानात अनेक महिलांनी अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांना लवकरच उत्तर देणार असल्याचे त्यांनी काल स्पष्ट केले होते.

अकबर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर देशभरातून #MeToo ही मोहीम अधिक तीव्र झाली असून, विविध क्षेत्रातील महिला ज्या लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या, त्या महिला पुढे येत आहेत. या आरोपानंतर परदेश दौऱ्यावर असलेले अकबर यांना परदेश दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्यास सांगितले होते. त्यानंतर काल ते भारतात परतल्यानंतर त्यांनी आज न्यायालयात याबाबत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com