मोदी बनले वाईल्डलाईफ फोटोग्राफर

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

रायपूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील 'वाईल्डलाईफ फोटोग्राफर' मंगळवारी नया रायपूरमधील नंदनवन जंगल सफारीत दिसला. छत्तीसगड दौऱयावर असलेल्या मोदी यांनी जंगल सफारीवेळी वाघाचा जवळून फोटो काढला आणि पंतप्रधान वाघाचा फोटो काढत असल्याचे छायाचित्र प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या छायाचित्रकाराने टिपले. 

सोशल मीडियावर काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला. पिंजऱयात बंदिस्त असलेल्या वाघाच्या जवळ जाऊन मोदी फोटोग्राफी करत असल्याचे फोटोत दिसते. वाघही जणू पोझ दिल्यासारखा पिंजऱयाच्या अगदी जवळ आला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह सातत्याने नया रायपूरच्या विकासाचे प्रयत्न करत आहेत. गुंतवणूक आणि नव्या प्रकल्पांसाठी नया रायपूर मुख्यमंत्र्यांनी सर्व माध्यमातून प्रमोट केले आहे. जंगल सफारी प्रकल्प आठशे एकरांवर पसरला आहे. वाघासह सिंह, अस्वल, हरण, चिम्पांझी आदी वन्यजीव सफारीमध्ये जवळून पाहता येतात.

मोदी यांनीही 'पर्यटन वाढीसाठी छत्तीसगडमध्ये खूप साऱया संधी आहेत,' असे ट्विट करून रमण सिंह यांच्या प्रयत्नांना बळ दिले आहे. 'आजच्या दिवशी प्रिय अटलजी (अटलबिहारी वाजपेयी) यांची आपल्याला आठवण येते. त्यांनी छत्तीसगडची निर्मिती केली होती,' असे ट्विट मोदी यांनी दौऱयानंतर केले. 

Web Title: modi becomes wildlife photographer