मोदी सरकारने देशाच्या सीमेला सुरक्षित केले - शहा

पीटीआय
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

अमृतसर - सीमा सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावरून आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीवर (यूपीए) हल्ला चढविला. गांधी परिवाराची सत्ता असताना कोणीही येऊन देशाच्या सीमेचा अपमान करत होते; परंतु नरेंद्र मोदी सरकारने सीमा सुरक्षित केल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

अमृतसर - सीमा सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावरून आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीवर (यूपीए) हल्ला चढविला. गांधी परिवाराची सत्ता असताना कोणीही येऊन देशाच्या सीमेचा अपमान करत होते; परंतु नरेंद्र मोदी सरकारने सीमा सुरक्षित केल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

पंजाबी सुबाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. एकेकाळी गांधी घराण्याची 10 वर्षे सत्ता असताना कोणीही एखाद्याच्या इच्छेवरून देशाची सीमा अपमानित करू शकत होते; परंतु मोदी सरकारने हे प्रकार बंद करत सीमा सुरक्षित केली असल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांना अनेक वर्षांत जे जमले नाही, ते मोदी सरकारने केवळ अडीच वर्षांतच करून दाखविल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आज भारताच्या सीमेकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाते, हे संपूर्ण जगाला कळले असून, मोदी सरकार आल्यापासूनच या गोष्टी बदलल्या असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीही अनेक कामे केली असून, गरीब, दलित आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी अनेक नवीन योजनाही आणल्याचे सांगत यामुळेच आता देशात एक नवी बदलाची लाट असल्याचे सांगितले. या वेळी शहा यांनी शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्या युतीला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही केले. पुढील पाच वर्षांसाठी सत्ता कोणाकडे असेल, हे पंजाबची जनता ठरवणार असून, एकीकडे पंजाबच्या हिताचा विचार करणारी आमची युती, तर दुसरीकडे येथील तरुणाईला नशाबाज म्हणणारे कॉंग्रेस अशी स्थिती असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देश

शशिकला यांचे "अंदर-बाहर' नवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख व्ही. के. शशिकला...

07.24 AM

नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान डोकलाममध्ये सुरू असलेल्या पेचावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री...

06.03 AM

आता मुहूर्त शुक्रवारनंतरचा शक्‍य नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची पहिली तारीख लांबण्यामागे सत्तारूढ भाजप...

05.03 AM